अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड मधील गाळ्या बाबत न्यायालयाने नुकताच निकाल दिला असून अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश दिले आहेत त्या गाळया बाबत आता ...
अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड मधील गाळ्या बाबत न्यायालयाने नुकताच निकाल दिला असून अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश दिले आहेत त्या गाळया बाबत आता चांगलेच राजकारण तापले असून काल व्यापाऱ्यांनी मार्केट यार्ड मध्ये आंदोलन करत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा निषेध केला होता.
आज नगर शहरात शिवसेनेचे शहर अध्यक्ष दिलीप सातपुते,नगरसेवक योगीराज गाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी पत्रकार परिषद घेऊन या गाळया बाबत भूमिका विषद केली.
ज्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहे ते गाळे शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठीची जागा होती.ज्या जागेवर बांधकाम करण्याचा परवाना मिळणार नाही त्याचा जागेवर बांधकाम करण्यात आले आहेत.
COMMENTS