अहमदनगर प्रतिनिधी /-सोमवारी रात्रीच्या वेळी दोन गटात रामवाडी येथे झालेल्या भांडणावेळी उद्योजक अफजल असीर शेख व साहेबान जहागीरदार हे घटनास्थ...
अहमदनगर प्रतिनिधी /-सोमवारी रात्रीच्या वेळी दोन गटात रामवाडी येथे झालेल्या भांडणावेळी उद्योजक अफजल असीर शेख व साहेबान जहागीरदार हे घटनास्थळी उपस्थित नव्हते. सदरील घटनेच्या वेळी ते दोघेही स्वतःच्या घरी होते. केवळ राजकीय हेतूने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे याची चौकशी व्हावी. गुन्ह्यातून त्यांची नावे वगळावीत व जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी समाजाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अफजल शेख हे जुना बाजार येथे घरीच होते. जहागीरदार हे त्यांच्या आईला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन रात्री घरी आले होते. फक्त राजकीय हेतूने या दोघांना त्रास देण्यासाठी त्यांचे राजकीय, सामाजिक व व्यवसायिक जीवन उध्वस्त करण्यासाठी फिर्यादीच्या सांगण्यावरुन कोणतीही चौकशी न करता त्यांचे नाव या गुन्ह्यात गोवण्यात आलेले आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. संबंधित घटनेशी कोणताही संबंध नसलेल्या शेख व जहागीरदार यांना सखोल चौकशी होईपर्यंत अटक करू नये. त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक समद खान, मुदस्सर शेख, शफी जहागीरदार, फय्याज शेख, रफिक मुन्शी, आसिफ आमीर शेख, शाकीर बागवान, नवनाथ शिंदे, आकाश औटी, अफरोज शेख, समीर बागवान, फय्याज निजाम बागवान, फारुख शेख, इम्रान सय्यद, नवेद शेख, सचिन छजवाणे, उजेर सय्यद, खालिद शेख आदींसह नागरीक, समाजबांधव उपस्थित होते.
COMMENTS