नगर प्रतिनिधी/-हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांनी आज अहमदनगर जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी शहरांमध्...
नगर प्रतिनिधी/-हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांनी आज अहमदनगर जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी शहरांमध्ये ठिकठिकाणी चौकाचौकात जाऊन हिंदू बांधवांशी संवाद साधला. यावेळी ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात धनंजय भाई देसाई यांचे स्वागत करण्यात आले आणि सत्कार देखील करण्यात आला. धर्मांध जिहाद्यांनी भारताचा पाकिस्तान केलाय. भारताचे इस्लामिकारण करण्याचं जे काम सध्या सुरु आहे त्यापासून सावध करण्याचा उद्देश हिंदू राष्ट्र सेनेचा असल्याचं यावेळी धनंजय भाई देसाई यांनी सांगितले.
अहमदनगर शहरातील असंख्य हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या मिरावली बाबा पहाड येथे गुरुवारी दर्शनासाठी गेलेल्या हिंदू बांधवांना काही समाजकंटकांनी मज्जाव करत घोषणाबाजी केली. मात्र हे पीर-बीर काही नसून दुष्ट अतिरेकी आणि जिहाद्यांची वृत्तींनी इथे असलेल्या नाथांच्या समाध्यांना पीर केलंय असा आरोप यावेळी धनंजय भाई देसाई यांनी केला. जिहाद्यांनी इथे पिराची ठाणे मांडून आध्यात्मिक दृष्ट्या भ्रष्ट करायचं किंवा धर्मांतर करण्याचं हे षडयंत्र असून पिरांची भूमि करू पाहणाऱ्या दृष्ट्या शक्तींचा सामना करून आपल्या पूर्वजांच्या पितृदेवतांच्या पावित्र्याचे संरक्षण करणे हे धार्मिक कर्तव्य असल्याचे धनंजय भाई देसाई म्हणाले
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावरनं सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. मात्र अहिल्यादेवी होळकर यांनी काशी विश्वनाथ चे लिंग स्थापन केले त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जिल्ह्याला ओळखलं पाहिजे असे मत धनंजय देसाई यांनी व्यक्त केले. अहमद कोण आहे असा सवाल करत नामांतरणाच्या माध्यमातून देशाचे धर्मांतर करणाऱ्या दुष्ट शक्तींच निर्धारण झालं पाहिजे असेही त्यांनी म्हणलंय.अहमदनगर मधील आलमगीर येथे असलेला औरंगजेब बादशहाचा चौथरा हटावण्याची मागणी हिंदू बांधवांनी केलीये. मात्र आलमगीर येथे असलेला औरंगजेब बादशहा चा चौथरा च काय तर औरंगजेब बादशहाचे खुलताबाद येथे असलेले थडगे देखील पेटवून दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया धनंजय भाई देसाई यांनी दिली आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवप्रभू आणि छत्रपती संभाजी महाराज हेच आहेत असे सांगत औरंगजेबच्या दुष्ट शक्तींचा जतन करणे हे पाप असल्याच देखील त्यांनी म्हणलंय.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे धनंजय भाई देसाई हे अहमदनगर मधून निवडणूक लढावणार कि काय अशी चर्चा नगर मध्ये सुरु आहे. मात्र ही चर्चा सर्वच जिल्ह्यात असून "जो हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा" या सूत्रानुसारच निवडणूक लढवली जाईल अशी घोषणा धनंजय भाई यांनी अहमदनगर मध्ये केलीये. 370 कायदा रद्द करणारे राम मंदिराचा भव्य निर्माण करणारे आणि काशी विश्वनाथाचे शुद्धीकरणासाठी प्रयत्न करणारी राज्यसत्ता या देशांमध्ये अखंड राहावी म्हणून हिंदू राष्ट्र सेना हिंदूंचा अध्यात्मिक आणि भौतिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याच धनंजय भाई देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS