नगर प्रतिनिधी - धर्मगुरू श्री.राजाभाऊ कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम एमआयडीसी येथे मंगल भक्त सेवा मंडळ परिवाराच्या वतीने सद्गुरु...
नगर प्रतिनिधी - धर्मगुरू श्री.राजाभाऊ कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम एमआयडीसी येथे मंगल भक्त सेवा मंडळ परिवाराच्या वतीने सद्गुरु श्री.शंकर महाराज मठामध्ये उद्या सोमवारी 10.30 च्या सुमारास महा अभिषेक , दुपारी बारा वाजता श्रींची महाआरती त्यानंतर महाराजांचे दर्शन सोहळा, महाप्रसाद व भजन , प्रवचन सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे तसेच कै.श्री कमलाकर काका तपस्वी यांचे पुतणे श्री योगेश तपस्वी यांची भजन संध्या होईल. तरी सर्व भक्तगणांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी असे आव्हान मंगल भक्त सेवा मंडळ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS