सरचिटणीस शिवाजी शिर्के अहमदनगर : नगर शहरातील मुख्य प्रवाहातील दैनिके, साप्ताहीकांचे संपादक, पत्रकारांसाठी अधिकृत वृत्तवाहिन्यांचे ...
सरचिटणीस शिवाजी शिर्के
अहमदनगर : नगर शहरातील मुख्य प्रवाहातील दैनिके, साप्ताहीकांचे संपादक, पत्रकारांसाठी अधिकृत वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी नगर प्रेस क्लब या संघटनेची घोषणा आज करण्यात आली. संघटनेची नोंदणी प्रक्रिया व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. प्रेस क्लबचे हंगामी कार्यकारी मंडळ निवडण्यात आले असून क्लबच्या अध्यक्षपदी अनंत पाटील (सार्वमत) यांची निवड करण्यात आली. तीन महिन्यात नोंदणी प्रक्रिया पार पाडून नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याची घोषणा अनंत पाटील यांनी केली.
लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, संदीप रोडे, बाळासाहेब धस, उमेर सय्यद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हंगामी कार्यकारीणी निवडण्यात आली. निवडण्यात आलेली हंगामी कार्यकारीणी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष- अण्णासाहेब नवथर (लोकमत) व मुरलीधर कराळे (सकाळ), सरचिटणीस- शिवाजी शिर्के (नगर सह्याद्री), सहचिटणीस- मिलींद देखणे (सामना), खजिनदार- राजेंद्र झोंड (पुण्यनगरी),
कार्यकारीणी सदस्य- सुर्यकांत वरकड (पुढारी), प्रशांत वाव्हळ (अजिंक्य भारत), मोहीनीराज लहाडे (लोकसत्ता), जयंत कुलकर्णी (प्रभात), रोहीत सोनवणे (लोकमंथन), अशोक झोटींग (मराठवाडा केसरी), मनोज मोतियानी (अहमदनगर घडामोडी), शिरीष कुलकर्णी (नवभारत), राजू खरपुडे (छायाचित्रकार), आदिल रियाज शेख (साप्ताहीक प्रतिनिधी), सुशील थोरात (इलेक्टॉनिक मिडीया प्रतिनिधी).
शहारातील पत्रकारांसाठी स्थापन झालेल्या या नव्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषदांचे आयोजनासह पत्रकारांच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती कार्यकारी मंडळाचे हंगामी अध्यक्ष अनंत पाटील यांनी दिली.
COMMENTS