अहमदनगर प्रतिनिधी – जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले तीन सराईत गुन्हेगार आदेशाचा उल्लंघन करून नगर जिल्ह्यात आल्याने त्यांना पकडण्यात स्...
अहमदनगर प्रतिनिधी – जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले तीन सराईत गुन्हेगार आदेशाचा उल्लंघन करून नगर जिल्ह्यात आल्याने त्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सागर चोथे ( रा. पितळे कॉलनी, नागापुर, अहमदनगर), अजमुद्दीन ऊर्फ नुरा सय्यद (रा. गजानन कॉलनी, नवनागापुर, अहमदनगर), संदीप कासार (रा. वडगांवगुप्ता, ता. नगर ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन सदरचे हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करणेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना आदेश दिले होते. त्यानुसार पोनि श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या.
पोसई सोपान गोरे, सफी राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, पोना भिमराज खर्से, रवि सोनटक्के, देवेंद्र शेलार व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर यांचे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून हद्दपार इसमांना चेक करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पथकातील अधिकारी व अंमलदार हे अहमदनगर शहरातील हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना पोनि श्री कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, हद्दपार सागर चोथे, अजमुद्दीन ऊर्फ नुरा सय्यद, संदीप कासार हे हद्दपार असताना लपूनछपून अहमदनगर शहरामध्ये वास्तव्य करीत आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
पथकातील अंमलदार यांनी नमुद हद्दपार इसमांचा शोध घेतला असता हद्दपार असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. हद्दपार गुन्हेगारांचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता, हद्दपार प्राधिकर तथा पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचेकडील आदेश क्रमांक स्थागुशा हद्दपार एमआयडीसी पोस्टे/५५/४५४६/२१, दि. २५/०८/२१ पासुन १८ महिने कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. हे हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या नगर तालुका भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द एमआयडीसी पोस्टे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पुढील कार्यवाही एमआयडीसी पोस्टे करीत आहे.
COMMENTS