अहमदनगर प्रतिनिधी /- प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त कलागुण असतात. या कलागुणांना सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल नेहमीच प्रोत्साहन देत आले अस...
अहमदनगर प्रतिनिधी /- प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त कलागुण असतात. या कलागुणांना सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल नेहमीच प्रोत्साहन देत आले असून, स्कूलच्या वतीने मुलांनी विविध स्पर्धांत सहभागी व्हावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून याला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे नवनवीन गोष्टींचे आकलन मुलांना होते. नगरमधील विविध सामाजिक संस्था व आस्थापने पुढे येऊन चांगल्या उपक्रमांचे आयोजन करते. त्यामुळे मुलांना आपली कला सिद्ध करण्यास हक्काचे व्यासपीठ होत असल्याबद्दल संस्थेचे सेक्रेटरी दामोधर बठेजा यांनी समाधान व्यक्त केले.
सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व रेडिओ सिटी आयोजित चित्रकला स्पर्धेत सुयश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने गौरव करण्यात आला. याप्रसंगी श्री. बठेजा बोलत होते. यावेळी प्राचार्या गीता तांबे, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी, उपप्राचार्या कांचन पापडेजा, कलाशिक्षक बाळासाहेब गुंजाळ, अनामिका म्हस्के आदींसह स्कूलमधील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
या चित्रकला स्पर्धेत यश संपादन केलेले स्कूलमधील विद्यार्थी असे - गट क्र. 1मध्ये - अंश मंत्री (प्रथम) व पूजा ताटी (द्वितीय), गट क्र. 2 - आर्या निंबाळकर (प्रथम) व अपूर्वा नांदूरकर (द्वितीय), गट क्र. 3 - अर्चना ताटी (प्रथम), अन्वेषा मंत्री (द्वितीय) व वरद डोक्रस (उत्तेजनार्थ). सुपा येथे झालेल्या राज्यस्तरीय कीक बॉक्सिंग स्पर्धेत वेदिका जोशी हिने 50 किलो वजनगटात द्वितीय क्रमांक मिळवून तिची पुणे येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचाही यावेळी गौरव करण्यात आला.
प्राचार्या गीता तांबे म्हणाल्या की, ऑनलाईन शिक्षणामुळे काहीसे हिरमुसलेल्या मुलांना ही चित्रकला स्पर्धा आनंद देणारी ठरली. या स्पर्धेत स्कूलमधील विविध वर्गातील मुले सहभागी झाली होती. अतिशय उत्कृष्ट अशी चित्रे काढून त्यांनी सुयश मिळविले, असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना बाळासाहेब गुंजाळ व अनामिका म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त रूपचंद मोटवाणी, दामोधर माखिजा, राम मेंघानी, अमरशेठ तलरेजा, महेश मद्यान आदींनी अभिनंदन केले आहे.
सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व रेडिओ सिटी आयोजित चित्रकला स्पर्धेत सुयश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी दामोधर बठेजा, प्राचार्या गीता तांबे, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी, उपप्राचार्या कांचन पापडेजा, कलाशिक्षक बाळासाहेब गुंजाळ, अनामिका म्हस्के आदी.

COMMENTS